क्राइम

लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल……!

अंबाजोगाई दि.१९ ( पांडुरंग केंद्रे)
 अंबाजोगाई येथील २० वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर गंगाखेडच्या तरुणाने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या तरुणावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
               पिडीतेच्या फिर्यादीनुसार ती पतीच्या निधनानंतर दोन वर्षापासून आई वडिलांकडे राहते, आई वडील दुसऱ्याच्या शेतात काम करुन उपजिवीका भागवतात. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेकडे तिचा भाऊ गजानन मदनराव पेटकर राहणार गंगाखेड जि. परभणी हा अधुनमधून येत असे. त्या दरम्यान त्याने पीडितेला लग्नाची मागणी घातली, या लग्नाला दोन्ही कुटुंबाची परवानगी होती. परंतु लाॅकडाऊनमुळे लग्न रखडले. गतवर्षी २५ फेब्रुवारी रोजी पिडिता त्यांच्या घरी गेली असता गजाननने घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. लाजेखातीर पिडितीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. तर त्यानंतर रोजच लग्नाचे आमिष दाखवून गजाननने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर काम मिळाल्याचा बहाणा करुन गजानन गावाकडे गेला आणि त्याने २२ एप्रिल २०२१ रोजी दुसऱ्या एका महिलेसोबत लग्न केले.  पिडितीने याबाबत जाब विचारला असता त्याने जबरदस्तीने लग्न लावल्याचे सांगितले व पिडितेशी पुन्हा लग्न करायचे आहे असे म्हणु लागला.                                                     सदर फिर्यादीवरुन गजानन पेटकर याच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बलत्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक पोलीस मोनिका पवार करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close