क्राइम
रिक्षा चालकास मारहाण, केज पोलीसांत गुन्हा दाखल……!

केज दि. २१ – रिक्षा घेवुन चल या कारणावरुन हातातील लोखंडी पाइप रिक्षा चालकाच्या डोक्यात मारुन जखमी करत शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या प्रकरणी केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश रुपाजी जाधव रा.समर्थ नगर हे रिक्षा चालक दि.२१ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता कानडी चौकात होते. त्या दरम्यान अजय गायकवाड रा. क्रांतीनगर केज तिथे आला व रिक्षा घेऊन चल म्हणत हातातील पाईपने रमेश जाधव यांच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी रमेश जाधव यांचा पुतण्या रामा सुनिल जाधव आला असता त्यासही आरोपीने लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व शिवीगाळ केली अशी फिर्याद रमेश जाधव यांनी दिल्यावरून अजय गायकवाड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मंगेश भोले हे करत आहेत.