कोरोनाच्या तिसऱ्या लाटे बाबत महत्वाची माहिती……!
मुंबई दि.२२ – सुखासमाधानाने भरलेल्या मानवी जिवनाला नजर लावणारा कोरोना समग्र मानवी समुहाला उद्ध्वस्त करतोय. गेली दीड वर्ष झाल आपल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस मृत्यूच्या भयाने ग्रासला आहे. कोरोना, डेल्टा, व्हाईट फंगस, दुसरी लाट, तिसरी लाट या शब्दाच्या भोवतीच आपलं आयुष्य गुंतून पडलं आहे.महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेने एवढा धुमाकूळ घातला की जिवंत राहिलो हेच नशीब अस सर्वत्र बोललं जाऊ लागलं आहे. हे असताना तीसऱ्या लाटेची भीती ही सतावत आहे. पण आता मोठ्या प्रमाणात लसीकरण होतं आहे. गावागावात, वस्ती, तांड्यावर, शहर भागात, या लसीकरणाचा वेग वाढला आहे.
तिसऱ्या लाटेचा धोका कमी होत आहे. याबाबत विविध तज्ज्ञांनी आपली मतं मांडली आहेत. जरी ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेप्रमाणे विनाशकारी आणि प्राणघातक असणार नाही. आणखी एक लाट येणार की, नाही हे जाणून घेण्याची निश्चित अशी पद्धत नाही. मात्र, दुसऱ्या लाटेइतकी ती त्रासदायक नसेल, असं मत डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी या वेळी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, कोरोनाचा धोका हा काही सांगून थांबणार नाही. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. लस घेतली असेल तरीही मास्क घालणं, सॅनिटायझरचा वापर करणं हे गरजेचं आहे. कोरोनाचे विशेषज्ञ एन. के. अरोरा यांच्या मते आणखी तीन आठवडे थांबावं लागेल जेणेकरून, तिसऱ्या लाटेबाबत ही वास्तविक टिप्पणी करू शकता येईल. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत.