#Social
केजचे पीएसआय श्रीराम काळे यांना निरोप……!

केज दि.२२ – येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांची औरंगाबाद ग्रामीण येथे बदली झाली आहे. त्या निमित्त दि. २१ ऑगस्ट रोजी त्यांचा केज पोलीस स्टेशनच्या वतीने निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी पोलीस अधिकारी तथा वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे हे होते तर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांच्या प्रमुख उपस्थित निरोपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रभारी पोलीस अधिकारी वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहाय्यक फौजदार महादेव गुजर, सहाय्यक फौजदार लांडगे, पत्रकार गौतम बचुटे यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांची तपास करताना अधिकारी व कर्मचाऱ्या सोबतचे स्नेहाचे संबंध आणि कामाची पद्दत या बाबत आपल्या भाषणातून सांगितले. तर श्रीराम काळे यांनी केजचे अधिकारी कर्मचारी मनमिळाऊ व सहकार्य करणारे असल्याची भावना व्यक्त केली.
