राजकीय
केज शहरात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पुतळयाचे दहन………!
केज दि.24 – शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल भाजपाचे केंद्रिय मंञी नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्यामुळे केज तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा संपक॔प्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 24/8/2021 रोजी सकाळी 11वाजता छञपती शिवाजी महाराज चौक केज येथे नारायण राणे यांच्या पुतळयाचे दहन करण्यात आले.
यावेळी केज पोलिस स्टेशनला जाऊन शिवसेना केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे व महिला आघाडी सहसंपक॔ प्रमुख रत्नमाला मुंदे यांच्यासह शिवसैनिकांनी निवेदन देऊन नारायण राणे यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करण्याची मागणी केली.
यावेळी युवासेना ता. प्रमुख अरविंद थोरात, तालुका समन्वयक बालु पवार, तालुका संघटक अशोक जाधव, उपतालुका प्रमुख विकास काशिद, सुनिल पटाईत, अभिमान पटाईत, युवासेना शहर प्रमुख तात्या रोडे, पप्पू ढगे, तालुका सचिव रामहरी कोल्हे, विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख अनिल ठोंबरे, ज्ञानेश्वर बोबङे, भारत तुपारे कलसकर, सागर जाधव, ऋषी घुले, विशाल कोकाटे सह शिवसैनिक उपस्थिती होते.