राजकीय
अंबाजोगाई नगर परिषदेचा भोंगळ कारभार सुरूच – राजेश वाहुळे

अंबाजोगाई दि. २४ – ( पांडुरंग केंद्रे)
आंबेजोगाई नगर परिषदे च्या वतीने कोट्यावधी रुपयांचे टेंडर काढून यशवंतराव चव्हाण चौक येथे सुसज्ज असे अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुल बांधण्यात आले. त्या संकुलाच्या मागच्या बाजूस जवळपास दीडशे भाजीपाला विक्रेत्यांसाठी सुसज्ज असे कट्टे बनवण्यात आले त्यावर सुद्धा जवळपास नगर परिषद च्या वतीने एक कोटी खर्च करण्यात आला परंतु एवढा खर्च करून सुद्धा मागील सात वर्षांनी इथे कसलीच भाजीमंडई नगरपरिषदेच्या वतीने बसवण्यात आली नाही.
जर नगराध्यक्ष रचना मोदी यांना तिथे भाजी मंडई बसवायची नव्हती तर कोट्यावधीचा खर्च नेमका कशासाठी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आला ? याचे उत्तर सत्ताधारी काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी यांनी द्यावे. तसेच आज लोकजनशक्ती पार्टी च्या वतीने निवेदन देण्यासाठी नगरपालिकेला गेलो असता तिथे एकही अधिकारी निवेदन स्वीकारण्यास उपस्थित नसल्यामुळे याचा निषेध म्हणून लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक यांच्या खुर्चीला निवेदन देऊन निषेध करण्यात आला. यावेळी लोकजनशक्ती पार्टी युवा चे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष राजेश वाहुळे, तालुका अध्यक्ष अशोक काळे, गणेश घाडगे, गुट्टे इत्यादी उपस्थित होते.