हवामान
केज तालुक्यातील कांही भागात जोरदार पाऊस, पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प……!

केज दि.24 – मागच्या कांही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचेच तोंडचे पाणी पळाले होते. मात्र मागच्या चार दिवसांपासून तालुक्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाल्याने पिकांना तूर्त जीवदान मिळाले आहे.

तालुक्यात एकाच वेळेस सर्वदूर पाऊस होत नसला तरी कधी इकडे तर कधी तिकडे अशी हजेरी लावत आहे. त्यातच दि.२४ रोजी दुपारी तालुक्यातील कानडी माळीच्या वरच्या शिवारात, साबला, धर्माला, तरनळी, इत्यादी जोरदार पाऊस बरसल्याने केज ते येवता, साबला या मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सदरील मार्गावरील प्रवासी बराच वेळ अडकून पडले होते.