क्राइम
प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेला लुटले, केज पोलीसांत गुन्हा दाखल……!
डी डी बनसोडे
August 25, 2021
केज दि.25 – प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोन्याचे टॉप्स काढून घेतले. दागिने चोरीच्य घटना केज तालुक्यात मागच्या कांही दिवसांपासून घडत आहेत त्यामुळे महिलांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
केज येथे दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२:३० ते १२:४५ च्या दरम्यान ४८ वर्षीय महिला छाया मुकुंद वाकळे हिला केज येथील सुहाना हॉटेल समोर माणिक त्रिंबक सिरसट व त्याच्या सोबतच्या अनोळखी इसमाने प्रसाद म्हणून पेढा दिला. त्या पेढ्यात गुंगी येणारे औषध मिसळले होते. पेढा खाताच छाया वाकळे यांना गुंगी आली आणि त्याचा गैरफायदा घेत माणिक सिरसट व त्याच्या सोबतच्या अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र व कानातील सोन्याचे टॉप्स असा एकूण ३३ हजार ५०० रु चा मुद्देमाल घेऊन ते पसार झाले. गुंगी उतरताच छाया
दरम्यान, वाकळे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दि. २५ ऑगस्ट रोजी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून माणिक त्रिंबक सिरसट व त्याचा अनोळखी साथीदार याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४०९ / २०२१ भा. दं. वि. ३२८, ३७९ आणि ३४ नुसार गुन्हा दाखलकरण्यात आला आहे प्रभारी पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करीत आहेत