केज तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय महिलेच्या फोनवर उत्तरेश्वर शिवाजी ओव्हाळ ( रा. तांबवा ता. केज ) याने फोन करून शिवीगाळ करीत तू मला भेटली नाहीस तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तर या महिलेच्या वॉट्सअपवर अश्लील फोटो पाठवून लज्जा वाटेल असे कृत्य करीत तू मला बोलली नाहीस तर तुझ्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करीन अशी ही धमकी दिली. अशी फिर्याद सदर महिलेने दिल्यावरून उत्तरेश्वर शिवाजी ओव्हाळ याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे करीत आहेत.