राजकीय

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी राजेसाहेब देशमुख…….!

बीड दि.26 – राष्ट्रीय काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी  बीड जि.प. चे माजी सभापती राजेसाहेब देशमुख यांची वर्णी लागली असून कार्यक्षम व जनतेतील जिल्हाध्यक्ष मिळाल्याने काँग्रेस आय ला बळकटी मिळणार आहे.
                  बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसा पासून सुरू असलेल्या जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेला अखेर आज पूर्णविराम मिळाला असून बीड जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांची वर्णी लागली असून माजी मंत्री अशोक पाटील व रजनी ताई पाटील यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत. धडाडती तोफ म्हणून परिचित असलेले एक सर्वसमावेशक व जनतेत राहून सदैव काम करणारा जिल्हा अध्यक्ष पक्षाला मिळाल्याने जिल्ह्यात काँग्रेसचे प्राबल्य वाढणार व कार्यकर्त्यांना ही बळ मिळणार आहे.
                  राजेसाहेब देशमुख यांच्या निवडीचे जिल्हाभरात स्वागत होत असून जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये पाटील कुटुंबियांचे प्राबल्य पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल माजीमंत्री अशोकराव पाटील, मा.खासदार रजनी ताई पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील, कृषी विद्यापीठाचे संचालक राहुल सोनवणे यांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close