टेम्पो चालक लक्ष्मण गोविंदराव पाटील (रा.नेहरू नगर, उल्हासनगर) हे दि.२८ रोजी १२ ते १२.३० च्या दरम्यान आयशर कंपनीचा टेम्पो घेऊन धर्माबाद वरून मांजरसुम्बा रोडवरून चालले होते. सदरील टेम्पो (MH – DK 0407) केज तालुक्यातील सावंतवाडी जवळील टोलनाक्याजवळ आला असता अज्ञातांनी टेम्पो वरील ताडपत्री फाडून टेम्पोतील मॅक्डाल नं. 1कंपनीच्या विदेशी दारुचे १२ बॉक्स एकूण ८०७४८ रुपये किंमतीचा माल चोरून नेला.
लक्ष्मण गोविंदराव पाटील यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस नाईक धन्यपाल लोखंडे हे करत आहेत.