हवामान

कांही ठिकाणी नदीला पूर तर कांही बंधारे ‘ओव्हरफ्लो’…….!

बीड दि.31 – मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात अहमदनगरमध्येही चांगला पाऊस आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. औरंगाबादच्या  सोयगाव तालुक्यतील बनोटी येथे हिवरा नदीला पूर आला आहे. त्यामुळे गावाचा पूल वाहून गेला असून गावाचा संपर्क तुटला आहे. नदीला सध्या पुर असल्याने गावातही पाणी घुसले आहे. पाऊस सुरू आहे आणि पूल ही वाहून गेल्याने मदत कार्य करण्यास अडचणी येत आहेत.

                     बीड जिल्ह्यात काही भागात मध्यरात्री जोरदार पाऊस कोसळत आहे. कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कुंडलिका आणि माणिकर्णीक नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने नदी काठावरील गावांना इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, काल हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली काही भागात तर जोरदार पाऊस झाला या पावसामुळे काही भागातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. माजलगाव तालुक्यातील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. राजेवाडी येथील बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. कुंडलीका नदीला पावसामुळे अक्राळविक्राळ रूप आल्याचं पाहायला मिळत आहे तर बीड तालुक्यातील आंबेसावळी येथील मनकर्णिका नदीला पूर आला आहे. मागील अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. बीड जिल्ह्यातील काही भागात मोठा पाऊस झाला तर अजूनही बीड जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close