#Social

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंदे सेवानिवृत्त…….!

केज पोलीस ठाण्याच्या वतीने हृदय सत्कार

 केज दि.३१ – केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उमाशंकर शिंदे हे विहित वयोमर्यादे नुसार सेवा निवृत्त झाले. त्या बद्दल त्यांना निरोप देण्यात आला.
            उमाशंकर शिंदे हे एक धार्मिक सांप्रदायिक असून ते कीर्तनकार व उत्कृष्ट वक्ते देखील आहेत. शिंदे हे सर्व सहकारी व अधिकारी यांच्याशी अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ संबंध असलेले कर्मचारी म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. तसेच त्यांनी पूर्वी राज्य राखीव दलात देखील सेवा केलेली आहे. दि. ३१ ऑगस्ट रोजी वयाच्या ५८ वर्षी ते सेवा निवृत्त झाले त्या बद्दल केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शंकर वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.
                यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, जिल्हा पोलीस अधीक्षकांचे वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर, लांडगे, शिवाजी शिनगारे यांनी शिंदे यांच्या विषयी बोलताना अनुभव व भावना व्यक्त केल्या. तर उमाकांत शिंदे यांनी निरोपाला उत्तर देताना सर्वांचे ऋण व्यक्त केले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close