क्राइम

एक साधी चूक एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करू शकते……!

अकोला दि.२ – उपचारादरम्यान एचआयव्ही (HIV) बाधीत रक्तपुरवठा झाल्यामुळे आठ महिन्यांची एक चिमुकली अकोल्यातील मूर्तिजापुरात एचआयव्ही बाधीत झाली असून महिनाभरापूर्वीच्या या प्रकाराची तक्रार, आज या चिमुकलीच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आरोग्यमंत्र्याकडे दिली आहे.

                   अकोल्यातील मूर्तिजापूर येथील अवघाते हॉस्पीटल मध्ये तालुक्यातील हिरपूरच्या एका ८ वर्षीय चिमुकलीवर उपचार सुरू होते. तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे अकोल्याच्या बी.पी.ठाकरे रक्तपेढीतून मागविण्यात आलेले रक्त तिला देण्यात आले होते.

त्यानंतरही तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशींमध्ये वाढ होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे तिला अमरावतीच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथील तपासणीत तिचा एचआयव्ही अहवाल पॉझीटीव्ह आला. तिच्या आई-वडीलांचा, मात्र निगेटीव्ह आला. त्यामुळे एचआयव्ही बाधीताचे रक्त देण्यात आल्यामुळे ही चिमुकली बाधीत झाल्याची शंका बळावली. सदर चिमुकलीच्या पालकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आरोग्यमंत्र्याकडे यासंदर्भात तक्रार दिली आहे.
                           दरम्यान, या संदर्भात अवघाते हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी बालीकेच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याने तिला ते रक्त देणे आवश्यक होते. परंतु आमच्याकडे अधिकृत रक्तपेढीतुन आलेले रक्त संपूर्ण तपासण्या केलेले रक्त असल्याचे आम्ही गृहीत धरतो, नातेवाईकांनी आणलेले रक्त आम्ही चढवीले ते पॉझिटीव्ह असल्याचे आम्हाला माहिती नसल्याचे सांगितले. तर रक्तदात्यांकडून रक्त घेतल्या नंतर त्या रक्ताच्या किमान पाच तपासण्या केल्या जातात, या बाळाला ज्या व्यक्तीचे रक्त देण्यात आले तेव्हा तो निगेटिव्ह होता. ‘विंडों पिरियड’ दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे रक्तपेढीकडून सांगण्यात आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close