क्राइम
पीडित अल्पवयीन मुलीस विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न……!
केज दि.२ – शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्राप्त करून सदरील मुलगी गर्भवती झाल्याचे कळताच तिला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी केज पोलीसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावांत एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी मे 2021 ते ऑगस्ट 2021 या दरम्यान शेळ्या चारण्यासाठी गेली होती. त्या दरम्यान नात्यातीलच आरोपीने सदरील पीडित मुलीस गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढून बळजबरीने शारीरिक संबंध प्राप्त केले. त्यानंतर सदरील पिडीत मुलगी गर्भवती झाल्याचे मुलीने सांगितले असता आरोपीने सदरील मुलीस विहिरीत ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात बालकांचे लैंगीक अपराधांपासून संरक्षण अधिनीयम 2012 तसेच शारीरिक अत्याचार अन्वये केज पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून सपोनी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथक प्रमुख सीमाली कोळी, रुक्मिणी पाचपिंडे ह्या करत आहेत.