क्राइम

मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू तर पतीनेही घेतला गळफास, दोन मुलांचे छत्र हरपले…….!

लातूर दि.7 – चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या साकोळ इथे घडली आहे. सततच्या वादावादीनंतर माहेरी गेलेल्या पत्नीला पतीने पुन्हा नांदायला बोलावलं. त्यानंतर केलेल्या बेदम मारहाणीत छातीला जबर दुखापत झाल्यामुळे पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यामुळे पतीनेही गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

लातूर जिल्ह्यात शिरूर-अनंतपाळ तालुक्यातील साकोळमध्ये सिद्धेश्वर शिंदे आणि पत्नी मनिषा शिंदे हे आपल्या दोन मुलांसह राहत होते. चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादात आरोपी पती सिद्धेश्वरने पत्नी मनिषा यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये छातीला जबर जखम झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर पती सिद्धेश्वर यानेही घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.सिद्धेश्वर शिंदे (वय 35 वर्ष) आणि त्याची पत्नी मनिषा शिंदे (वय 27 वर्ष) यांच्यामध्ये सतत वाद होत असत. त्यामुळे मनिषा काही दिवस माहेरी जाऊन राहिली होती. दोन दिवसांपूर्वीच सिद्धेश्वरने तिला विश्वासात घेऊन गावी साकोळ इथं बोलावलं होतं. घटना घडली तेव्हा घरात दुसरं कोणीही नव्हतं.

दरम्यान,  छातीला जबर जखम झाल्याने मनिषाचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर सिद्धेश्वरनेही घरात गळफास घेतला. या घटनेमुळे दाम्पत्याच्या मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे. शिरूर-अनंतपाळ पोलीस ठाण्यात या घटने प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close