क्राइम

केज तालुक्यात विनयभंगाच्या दोन घटना…….!

केज दि.७ – केज तालुक्यात महिला अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून शारीरिक अत्याचार, विनयभंग यासारख्या घटनांमुळे गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे.त्यातच तालुक्यात विनयभंगाच्या दोन घटना घडल्याने केज पोलीसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
            बन्सी सुंदर पवार रा.वरपगाव व सुनील मधुकर शिंदे रा.पिंपळगाव या दोघांनी दि.७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा च्या दरम्यान  शहरात राहणाऱ्या एका मजुरी करणाऱ्या महिलेचा पाठलाग करून जबरदस्तीने घरात घुसले. तसेच बन्सी पवार याने लज्जास्पद कृत्य केले तर सुनील शिंदे याने गाडीवर बस म्हणत मारहाण केली.
            तर अन्य एका घटनेत प्रशांत बाबुराव केदार याने दि.४ सप्टेंबर रोजी दुपारी एक ते दीड च्या सुमारास मका आणण्यासाठी गेलेल्या महिलेबरोबर गैरवर्तन करत विनयभंग केला. सदरील महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
         पीडित महिलांच्या फिर्यादीवरून केज पोलीसांत गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रभारी पोलीस अधिकारी शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस रुक्मिणी पाचपिंडे पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close