आरोग्य व शिक्षण

डेंग्यू चा कहर वाढत आहे, सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात गर्दी वाढली……!

बीड दि.8 – हवामान बदलत आहे, अजूनही अनेक शहरांमध्ये पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणामुळे डेंग्यूचा धोकाही अधिक वाढला आहे. दिल्ली, महाराष्ट्र,पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. सरकारकडून अनेक आवश्यक पावले उचलली जात आहेत. डेंग्यू बद्दल सर्वांना माहित आहे की, डासं चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते.

डेंग्यूची लागण टाळण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्नही केले जातात. परंतु, बऱ्याचदा लोक डेंग्यू आणि सामान्य तापामध्ये फरक करू शकत नाहीत आणि स्थिती अनियंत्रित होते. डेंग्यूच्या तापाला अनेक वेळा सामान्य ताप मानला जातो आणि त्यावर उपचार घेतला जात नाही. ज्यामुळे समस्या वाढते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की डेंग्यू ताप आणि सामान्य तापामध्ये फरक कसा ओळखायचा.प्रत्येक डास चावल्यानंतर डेंग्यू होत नाही. माजा एडीस डास चावल्यानंतरच डेंग्यू होतो. सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर ज्या डासांवर पांढरे टिपके असतात, ते डास डेंग्यूचे असतात. तसेच या डासांच्या पायावर पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात, ते देखील डेंग्यूचे डास असतात. असे मानले जाते की, हे डास अनेकदा प्रकाशात चावतात आणि ते सकाळी चावण्याची अधिक शक्यता असते. अनेक अहवालांमध्ये हे उघड झाले आहे की माजा एडीस डास फार उंच उडू शकत नाही आणि केवळ मानवाच्या गुडघ्यापर्यंत येऊ शकतो.डेंग्यू डास चावल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी डेंग्यू तापाची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यूमध्ये डोळे तापाने लाल होतात आणि रक्त कमी होते. काही लोक चक्कर आल्यामुळे बेशुध्द होतात. सीनियर सीटिजन स्पेशलिस्ट डॉक्टर रिशव बंसल म्हणतात की, ‘जर या हंगामात कोणाला ताप, सर्दी आणि  शरीर दुखत असेल तर त्यांनी शक्य तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच, प्लेटलेट्स तपासल्या पाहिजेत. ताप आल्यामुळे एक किंवा दोन दिवस घरगुती औषध घेणे चुकीचे आहे. शक्यतो ताप आल्याबरोबर डॉक्टरांशी संपर्क साधा.

जर साध्या तापामध्येही काळजी घेतली गेली नाही तर तो ताप मेंदूपर्यंत जातो आणि घातक ठरू शकते. डेंग्यू तापामध्ये, शरीरातील रक्तातून प्लेटलेट झपाट्याने कमी होऊ लागतात. यातून होणारा धोका सामान्य तापापेक्षा कित्येक पटीने जास्त असतो. डेंग्यूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत होते आणि रुग्ण खूप कमकुवत होतो. अशा परिस्थितीत, जेव्हा डेंग्यू तापामध्ये प्लेटलेट्स कमी होतात. त्यावेळी तेही धोकादायक आहे.

                दरम्यान डेंग्यू चा डास प्रकाशात आणि विशेषतः दिवसा चावतो. त्यापासून संरक्षण करण्यासाठी घरात व कार्यालयात, क्लासेस मध्ये डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा, अंगभर कपडे घालावेत, घराच्या जवळ पाणी साठू देऊ नये, आठवड्यातून एक दिवस ड्राय डे पाळावा असा सल्ला केज शहरातील नामांकित बालरोगतज्ज्ञ डॉ.दिनकर राऊत यांनी दिला आहे. 

(डॉ.दिनकर राऊत, बालरोगतज्ज्ञ)

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close