#Accident
एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश, दोन बलिकांचा मृत्यू…..आईवर उपचार सुरू……!

केज दि.८ – सर्व कुटुंब रात्री झोपीत असताना सर्पदंश झाल्याने दोन बलिकांचा मृत्यू तर आईवर उपचार सुरू आहेत.
केज तालुक्यातील सोनेसंगवी 2 येथील दीपक साखरे हे त्यांच्या पत्नी जयश्री साखरे व 5 व 3 वर्षाच्या दोन मुली असे संपूर्ण कुटुंब झोपी गेले होते. परंतु रात्री 11 ते 12 च्या दरम्यान दीपक यांची पत्नी जयश्री व दोन मुलींना सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान सदरील घटना घडल्यानंतर तिघीनाही अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले.परंतु उपचारादरम्यान दोन्हीही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जयश्री यांच्यावर उपचार सुरू आहेत.सदरील दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
