
आष्टी दि.८ – शहरातील दत्त गणेश मंडळाचे…… वैशिष्ट्य म्हणजे एकाच व्यक्तीने नवसा प्रमाणे श्री ची मूर्ती देण्याची परंपरा आहे. गतवर्षी गत वर्षापासून 2033 पर्यंत मूर्ती आरक्षित झाल्या आहेत. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक पद्धतीचा विसर्जन मिरवणूक रथ असतो. यामध्ये बैलगाडीच्या टाका पासून बनवलेला हारत कुठल्याही इंधना शिवाय स्वतः गणेशभक्त रथ ओढत असतात. या गणेश मंडळाचे सलग पाच वर्ष महिलांच्या अध्यक्षतेखाली या गणेश मंडळाची स्थापना होते. तसेच या गणेश मंडळाच्या वतीने मागच्या काही वर्षात पारंपारिक पद्धतीचे, सामाजिक, कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
कसबा गणेश मंडळ…..!
या गणेश मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाचा देखील पारंपारिक पद्धती चा रथ असतो. तो रथ सर्व गणेशभक्त ओढत ओढत मिरवणुकीमध्ये सहभागी असतात. तसेच या गणेश मंडळांमध्ये पारंपारिक पद्धतीचे वाद्य तसेच शिवकालीन खेळ देखील सादर केले गेले आहेत. तसेच या मंडळाने फार मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद भंडारा देखील सर्व गावकऱ्यांना देण्याचे या मंडळाचे कार्य आहे. या मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे निबंध स्पर्धा, शालेय उपक्रम, रांगोळी स्पर्धा तसेच इतिहास कालीन व्याख्यानमाला देखील आयोजित केली आहे. तर गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देखील या मंडळाने वाटप केले आहे. तसेच या मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंडळातील काही सदस्यांनी आपले अवयव दानाचे संकल्प देखील केले आहेत. आष्टी शहरातील मानाचे समजले जाणारे हे तीन गणपती यांना अनादिकालापासून फार मोठी परंपरा आहे.पेठ गणेश मंडळाला यंदाचे 128 वर्ष आहे या मंडळाने लोककलेला प्रोत्साहन दिले आहे. तर या मंडळाची देखील विसर्जन मिरवणुक ही 11 व्या दिवशी होते.