शेती

गेवराई तालुक्यात प्रचंड पाऊस, गुरेढोरे वाहून गेले…….!

हजारो एक्कर पिकांचे नुकसान

गेवराई दि.८ -(देवराज कोळे) तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून सततच्या अवकाळी पावसामुळे कित्येक गावांमध्ये नदी नाले व ओव्हरफ्लो झाल्याने गुरेढोरे वाहून गेले असून जातेगाव नदीजवळ तळे फुटल्यामुळे गोळेगाव नदीला पूर आला. तर मारफळा येथील गावालगत तळे फुटल्याने चोपडेवाडी टाकळगव्हाण, सुर्डी गावात पाणीच पाणी झाले.
             भेड, कांबी, नंदपुर, खेर्डा चिंचोली, बाबुल्तारा देशमुखवाडी, पांढरवाडी यासह गोदाकाठची गावे राजापूर, गंगावाडी, भोगलगाव, राहेरी, बोरगाव थडी, दैठण, कट चिंचोली, मिरगाव, आंतरवाली, रामपूरी, ढालेगाव, गोपत पिंपळगाव ,श्रीपत अंतरवला, मनुबाई जवळा ,तपे लिमगाव, काठोडा ,गावातील शेतकऱ्यांचे पिके वाहून गेल्याची घटना घडली असून कित्येक गावांमध्ये गुरे ढोरे वाहून गेले असून मातीचे काही घरे पडले आहेत घरांमध्ये पाणी शिरले असून चोपडेवाडी मध्ये प्रचंड नुकसान झाल्याची घटना घडली आहे आडगाव रोहितळ पांगरी, चव्हाणवाडी, कोलतेवाडी, डोईफोडवाडी, सिरसदेवी, मारफळा, वाहेगाव, वाहेगाव आम्ला मालेगाव, आनंदपुर रामेश्वर, ताकडगाव, किनगाव, शिराळा, हिवरा, मुदापुरी, खांडवी आदी भागात नुकसान झाले आहे.
             गेवराई तहसील प्रशासन व कार्यसम्राट आमदार लक्ष्मण पवार यांच्यावतीने मदत कक्षाने रात्री झालेल्या पावसात अडकून पडलेल्या नागरिकांना मदत व घरी पोहोचण्यासाठी संपर्क करून मदत केली. तसेच रात्री काठोडा गावचा संपर्क तुटल्याने त्या गावात अनिता गिरी या महिलेला डिलिव्हरीसाठी पत्रकार गोपाल चव्हाण यांनी प्रशासनाला व आमदार साहेबांना माहिती देऊन प्रशासनाच्या माध्यमातून मदत केली. पेशंट दवाखान्यात पोहोच करण्यासाठी धावपळ करून मदत केली कार्यसम्राट आमदार लक्ष्मण पवार यांनी या सर्व घटनांची माहिती प्रत्येक गावात फोनद्वारे घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या. आमदार लक्ष्मण पवार यांच्या संपर्क कार्यातून 25 पदाधिकार्‍यांची नियुक्ती करून मदत कक्ष तयार करण्यात आले असून गाव वाईज पदाधिकारी पाहणी करून प्रशासनाला सोबत घेऊन नागरिकांना मदत करत आहेत. तसेच गेवराई तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून नागरिकांना सरसकट पन्नास हजार हेक्टरी मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.
                  घराची पडझड तसेच गुरेढोरे वाहून गेलेले असतील त्याचे पंचनामे करून तात्काळ मदत करण्यात यावी व ऊस, सोयाबीन, कापूस, तूर, मूग या सर्व पिकांचे सरसकट मदत शासनाने देण्यात यावी अशी शेतकरी बांधवांनी मागणी प्रशासनाकडे केली आहे. परिसरातील सर्व गाव व तळ्याची पाहणी करताना जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग थडके, जि. प. सदस्य प्रल्हाद माने, तलाठी शेख, ग्रामसेवक पाडुळे, मंडळाधिकारी कृषी अधिकारी सर्व प्रशासन पाहणी करून अहवाल सादर करत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close