शेती
अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा…..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
डी डी बनसोडे
September 9, 2021
गेवराई दि.९ ( देवराज कोळे) तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून अतिवृष्टीमुळे गोदावरी नदी, सिंदफणा नदी, अमृता नदी पात्राबाहेर पाणी गेले असून ओढे नाले पात्रे सोडुन वाहिले आहेत. यामुळे मारफळा,आम्ला, शेकटा चकलांबा इतर भागातील पाझर तलाव फुटल्यामुळे अनेक शेतकर्यांच्या जमिनी खरडून गेल्या.कापुस तुर सोयाबीन मुग ऊस आदी पिकांचे आतोनात नुकसान झाले, अनेक घराची पडझड झाली जिवीतहानी व वित्तहानी झाली असून बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे बाधीत सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी. ओढे नाले यावरील वाहून गेलेल्या पुलाची दुरस्ती तात्काळ व्हावी. गेवराई शेवगाव रोडवरील धोंडराई येथे तसेच खामगाव राक्षसभुवन रोडवर अमृता नदीवरील गंगावाडी येथे पुलाची उंची कमी असल्याने हे पुल पाण्याखाली जाऊन संपर्क तुटला जातो यासाठी या पुलाची उंची वाढवावी. आदी मागण्याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना गेवराई तालुका वतीने नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांना देण्यात आले.
पुढील आठ दिवसांत मागण्यावर निर्णय झाला नाहीतर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा प्रशासनाला देण्यात आला. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डाके पाटील, पक्ष तालुका अध्यक्ष रामनाथ महाडिक, माजी जिल्हा अध्यक्ष अशोक भोसले, पाचेगांव सर्कल प्रमुख उद्धव साबळे, शिरीष भोसले, ओमप्रकाश रुपनर, बाळासाहेब साबळे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.