क्राइम
भाविकास लूटमार चोरटा जेरबंद, केज पोलिसांनी मुद्देलाही केला हस्तगत…..!
केज दि. 9 – श्रावण सोमवारी उत्रेश्र्वर पिंपरी येथे दर्शनास गेलेल्या भाविकाच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरीस गेली होती. या प्रकरणी केज पोलीसात गुन्हा दाखल होताच केज पोलिसांनी सोनसाखळी चोराचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या व सोन्याची साखळी न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकास परत केली.
सोमवार निमित्त भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. येथील महादेव मंदिर परिसरात दर्शनासाठी सोमवार दिनाक २३ ऑगस्ट रोजी बाबासाहेब बिक्कड जात असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी एका चोराने अलगद काढून घेतली. या बाबत बाबासाहेब बिक्कड यांनी केज पोलिसांत तक्रार देताच प्रभारी ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे आणि त्यांचे सहकारी पोलीस नाईक नामदास, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस नाईक गवळी यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी दुल्लत यांनी मोबाईल सिडीआरचा तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या व त्याच्या कडून चोरलेली सोन्याची साखळी हस्तगत केली.
दरम्यान, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे आदेशाने चोरीस गेलेली सोन्याची साखळी बाबासाहेब बिक्कड यांना याला परत केली. यामुळे केज पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.