क्राइम
२५ जणां विरोधात युसुफ वडगाव पोलीसांत ॲट्रॉसीटी गुन्हा दाखल…….!
केज दि.१० – तालुक्यातील लाडेवडगाव येथील सर्वे.न.१४३ मधील गायरान जमीनीतील उभ्या पिकाची नासधूस केल्याच्या आरोपावरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात लाडेगाव येथील २५ जनाविरोधात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला असून तपास प्रभारी डी.वाय.एस.पी.करीत आहेत.
केज तालुक्यातील लाडेगाव येथील रावसाहेब एकनाथ धीरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी वरील गावचा राहणारा असुन लाडेगाव शिवारात सहें नं. १४३ मध्ये सरकारी गायरान असुन सदर गायरान मी व गावातील दलित समाजाचे 21 लोक अशांनी प्रतेकी दोन एकर या प्रमाणे एकून 44 एकर जमिन 30 वर्षापुर्वी पासुन वहीती करीत आहोत. यावर्षी खरीप हंगामात आम्ही सोयाबीन, मुग, उडीद, बाजरी, तुर ईत्यादी पिकाची पेरणी केली होती. परंतु सदर जमिनीत आम्ही पेरणी केलेल्या क्षेत्रावरील अतिक्रमण काढावे म्हणून ऊपोषणाला बसुन गावातील लोकांना आमच्या विरुध्द एकत्रीत केले आहे. व गावातील लोक यावर्षी दलित लोकांनी गायरानात अतिक्रमण करुन पेरणी केलेले पिक त्यांना खाऊ द्यायचे नाही. असे आपसात चर्चा करीत होते.
तर दि. 08/09/21 रोजी पोखरी ता. अंबाजोगाई येथील आमचे नातेवाईक मयत झाल्याने मी व आमचे भावकीतील ईतर सर्व महिला व पुरुष लोक अंत्यविधीकरीता पोखरी येथे सायंकाळी 6.00 वा. सुमारास गेलो होतो व रात्री अंदाजे नऊ वा.चे सुमारास गावात आलो. तर दि. 09/09/21 रोजी सकाळी 10.00 वा. चे सुमारास मी गायरान जमिनीत पेरणी केलेले सोयाबीन, तूर व बाजरी पिकाची पाहणी करण्या करीता शेतात गेलो त्यावेळी माझे व गायरान जमिनीत अतिक्रमण करून पेरणी केलेले क्षेत्रावरील इतरांचे सोयाबीन, तुर, बाजरी या पिकांत ट्रॅक्टर व जेसिबी घालुन रोटर करून आमचे पिकाची नासधुस करुन नुकसान केले आहे. तसेच कडबा व लाकडाचे कोपी जाळुन नुकसान केलेले दिसले. म्हणून मी भावकीतील वरील लोकांना फोन करून माहीती दिली. गावातील 70 से 80 लोकांनी गावातीलच जेसीबी, ट्रॅक्टर घेऊन दि. 08/09/21 रोजी सायंकाळी 6.00 ते दि. 09/09/21 रोजी पहाटे 04.00 वा. चे दरम्यान गायरानातील आम्ही पेरणी केलेले क्षेत्रावर वरील सर्व लोकांनी रोटर करून आमचे पिकाचे नुकसान केल. अशा तक्रारी वरून युसुफ वडगाव पोलीसांत 25 जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.