धारूर तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय महिला ही शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतातील बांधावरील गवत कापत होती. ती एकटीच असल्याची संधी साधून दादाराव बाळा लांब, हरिभाऊ बाळा लांब ( रा. चिंचपूर ता. धारूर) या भावांनी महिलेसोबत लज्जास्पद कृत्य करून विनयभंग केला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून दादाराव लांब, हरिभाऊ लांब या दोघा विरुद्ध युसुफवडगाव पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राठोड हे पुढील तपास करत आहेत.