#Social
चिखलगाळ तुडवत शेतकर्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित थेट बांधावर….…!
गेवराई दि.११ – अवकाळी पावसामुळे गेवराई तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून सेलू, गोळेगाव आणी जातेगाव गाव लगतचे तळे फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे व गुरे ढोराचे नुकसान झाले आहे. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी चिखल गाळ तुडवत थेट तळव्यावर जाऊन फुटलेल्या तळ्याची पाहणी केली तसेच शेतकऱ्यां सोबत संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. तर शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडे मागणी केल्याची माहिती यावेळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी नागरिकांना दिली.
गेवराई तालुक्यात अतिवृष्टीमुळे सेलू,व जातेगाव, गोळेगाव येथील गाव लगतचे तळे फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी पिके वाहून गेले. माजी आमदार बदामराव पंडित यांनी चिखल गाळ तुडवत थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सेलु, जातेगाव, गोळेगाव आदी गावातील तळ्याची, पाण्यामुळे वाहून गेलेल्या पिकाचे व शेतकऱ्यांचे नुकसान व पिकांची पाहणी केली.
दरम्यान, शेतकऱ्यांसोबत संवाद साधत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत सरसकट नुकसान भरपाई करण्यात यावी यासाठी शासनाकडे मागणी केली असल्याचे पंडित यांनी सांगितले. यावेळी शिवसेना तालुका संघटक भागवत आरबड, गोरख चव्हाण, युवा नेते देवराज कोळे, माजी सरपंच आप्पासाहेब काळे, नारायण चव्हाण अमोल धोंडरे, डाके पाटील, अभय पांढरे उपस्थित होते.