#Online fraud

केज शहरातील डॉक्टरची ऑनलाइन फसवणूक…….!

केज दि.१२ – मोबाईल च्या माध्यमातून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांपुढे आव्हान उभे राहिलेले आहे. यामध्ये निरक्षरच नाहीतर चांगले सुशिक्षित लोकही बळी पडत आहेत. असाच एक गंडा केज शहरातील डॉक्टरला घातला असून २१ हजाराचा फटका बसला आहे.
शहरातील कानडी रोडवर असलेल्या डॉक्टर प्रवीण किशनराव पैठणकर यांनी दि.२१ जून २०२१ रोजी दुपारी १.५५ वाजता पाईप दुकानदाराला पाठवलेले पैसे न गेल्याने फोन पे हेल्पलाईनला फोन केला. त्यानंतर लागलीच 9883753305 या मोबाईल नंबरवरून पैठणकर यांच्या मोबाईल नंबरवर फोन आला व फोनवरील अनोळखी व्यक्तीने AnyDesk नावाचे ऍप इंस्टॉल करून सर्व परमिशन ला मान्यता द्या म्हणून सांगितले. त्यानुसार पैठणकर यांनी यांनी सदर ऍप इन्स्टॉल केल्यानंतर आलेल्या सर्व परमीशन्सला मान्यता दिल्या. मात्र त्यानंतर त्यांच्या खात्यावरील 21,455/- रुपये डेबीट झाले.
दरम्यान डॉक्टर प्रवीण पैठणकर यांच्या फिर्यादीवरून केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी बीड सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close