शेती

शेतकऱ्यांनी आधुनिक साधनांचा वापर करावा – राजेश मुळे……!

 केज दि.१३ – बीड जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. बँकेने शेतकऱ्यासाठी सभासदांसाठी आत्तापर्यंत विविध योजना राबवल्या आहेत. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचे धोरण आतापर्यंत आखलेले आहे.  यातच नाबार्ड व जिल्हा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने  डिजिटल साक्षरता शिबीर तालुक्यातील विविध गावात घेण्यात आले.
              आजपर्यंत नवीन आधुनिक तंत्राच्या सुविधा बँकेने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले असून त्यात एटीएम सुविधा असेल मेसेज  सुविधा असतील पंतप्रधान अपघात विमा योजना 330 व 12  रूपये फॉर्म भरून वर्षभरासाठी विमा व इतरही अनेक लोकप्रिय योजना राबवल्या आहेत. नाबार्ड व जिल्हा बँकेने ग्रामीण भागातील जनतेला तंत्रज्ञानाची, सुविधेची ओळख व्हावी म्हणून केज तालुक्यातील होळ, लाडेवडगाव, वरपगाव, कुंबेफळ, हनुमंत पिंपरी, पिंपळगव्हाण, कापरेवाडी, सुर्डी, सोनेसांगवी या गावात संयुक्त शिबिरे घेऊन जनजागृती केली व लोकांना डिजिटल माध्यमाचा उपयोग करून व्यवहार कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
                  आता बँकेच्या शाखेत न  जाता विविध योजनांचा लाभ घेण्याची तयारी सर्वसाधारण शेतकरी व सभासदांनी करण्याची हमी दिली आहे. घरबसल्या बँकेचे बॅलन्स तपासणे, बँक आपल्या दारी या योजनेचा लाभ कसा घ्यावा हे प्रात्यक्षिकासह सांगण्यात आले. प्रामुख्याने बँकेतर्फे पाच लाख रुपये पर्यंत च्या  ठेविला संरक्षण असून जास्तीत जास्त सभासद खातेदार शेतकरी बांधव यांनी त्याचा लाभ घ्यावा व बँकेला सहकार्य करावे असे आवाहन बँकचे जेष्ठ तपासणीस राजेश मुळे यांनी केले आहे.
          सदरील मेळाव्याला तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्मचारी, विविध गावचे संरपच, चेअरमन, सचिव व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शेतकरी बांधवांनी नगदी व्यवहार न करता  डिजिटल माध्यमाचा उपयोग करून आपला दैनंदिन आर्थिक व्यवहार करावा व बँकेने पुरवलेल्या सर्व आधुनिक साधनांचा वापर करावा असे आवाहनही राजेश मुळे यांनी केले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close