
केज दि.१४ – धनेगाव ( ता. केज ) येथे युसुफवडगाव पोलिसांनी छापा मारून फेक पत्ता नावाचा जुगार खेळणाऱ्या ८ जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व नगदी ५ हजार ५२० रुपये जप्त करण्यात आले असून या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांना धनेगाव येथील मेसाई देवीच्या मंदिराच्या बाजूस असलेल्या झाडाखाली जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे, पोलीस शिपाई शामराव खनपटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४.१० वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी छापा मारला असता बाबुराव महादेव मुळे, संभाजी भागोजी सोनवणे, किशोर भारत सोनवणे, सूर्यकांत आश्रूबा सोनवणे, शंकर नागोजी सोनवणे, अरुण धोंडिबा शिंदे, शिवाजी रघुनाथ टेळे, सुंदर शंकर ढगे यांना फेक पत्ता नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व नगदी ५ हजार ५२० रुपये जप्त करण्यात आले असून शामराव खनपटे यांच्या फिर्यादीवरून वरील ८ जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.