हाताला काम नाही निवडला गुन्हेगारी मार्ग…….!
नाशिक दि.१५ – देशात कोरोनामुळे लाॅकडाऊन केल्यानं अनेक नागरिकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत 21 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याची आकडेवारी सरकारने दिली होती. त्यामुळे अनेकांना संकटाचा सामना करावा लागला होता. त्यातच आता हाताला काम नसल्यानं तरूणांनी चक्क चलनी नोटांचा कारखाना सुरू केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नाशिक येथे भारतीय चलनातील नोटांचा छापखाना आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील तरूणांचा कलर प्रिंटींगचा व्यवसाय आहे. कोरोना टाळेबंदीमुळं त्यांचा व्यवसाय हा बंद पडला आहे. बेरोजगार तरूणांनी शक्कल लढवत बनावट नोटांची छपाई केली आहे. त्यांचा हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर पोलिसांनी छापा टाकत सात तरूणांना अटक केली आहे. या बनावट नोट्यांचे धागेदोरे लासलगावच्या विंचूरपर्यंत पसरले आहेत. अटक झालेल्या तरूणांनी आतापर्यंत लाखो रूपये किंमतीच्या नोटा छापल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून हे तरूण नोटांची छपाई करत होते. हे सर्व तरूण अगदी नियोजन पद्धतीने नोटा छापून बाजारात चलनात वापरायचे. त्यांच्या शेजारील व्यापाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून बनावट नोटा आढळत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी सर्व तरूणांच्या कारनाम्याचा उघडकीस आणला.
दरम्यान, तरूणांनी थेट चलनी नोटांची छपाई केल्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत कोणाचा राजकीय हात आहे का? याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. यामुळं राजकीय क्षेत्रात देखील खळबळ झाली आहे.
(विडिओ आवडला तर like करायला विसरू नका plz)