क्राइम
सख्या भावाचे दगडाने नाक, कपाळ फोडले…….!

केज दि.१५ – तुझ्याकडे फिरत असलेली २० गुंठे जमीन चार माणसात मोजून दे असे म्हणत सख्या भावाने दगडाने मारहाण करून भावाचे नाक, कपाळ फोडल्याची घटना केज तालुक्यातील एकुरका येथे घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
एकुरका येथील शेतकरी सुभाष मारुती धस ( वय ३८ ) हे १४ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता घरी असताना विष्णु मारुती धस हा आला. त्याने तुझ्याकडे फिरत असलेली २० गुंठे जमीन चार माणसात मोजून दे असे म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण करून मुक्कामार देत दगडाने कपाळ, नाकावर मारून दुखापत केली. जिवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद सुभाष धस यांनी दिल्यावरून विष्णू धस याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार गोविंद बडे हे पुढील तपास करीत आहेत.