#Social
विश्वशक्ती क्रिडा व सांस्कृतिक गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर……!
केज दि.१५ – शहरातील भवानी नगर धारूर रोड येथील विश्वशक्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये 50 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.
सदरील शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष हनुमंत सत्वधर, उपाध्यक्ष गुड्डू तेलंग, मार्गदर्शक नितीन नेहरकर, पप्पू ढगे, सचिन कराड, सचिन नेहरकर, सुमित तेलंग,बापूराव कराड यांच्यासह किशोर शिंगण, विकास सत्वधर, महेश सत्वधर,विशाल सिरसट, विकास सिरसट, धिरज बोराडे, कृष्णा देशमुख, गणेश दांगट, अमर मुळे, समाधान डोईफोडे, दादा देशमुख, आशितोष सत्वधर, अभिजीत सत्वधर, उज्वल जवकर, अक्षय घोडके इत्यादी मंडळ कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.