क्राइम
सात जणांविरुद्ध केज पोलीसांत गुन्हा दाखल…….!
केज दि.१६ – तालुक्यातील हदगाव डोका येथे विवाहितेचा सासरच्या लोकांनी ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रु. घेऊन ये म्हणून मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी तिचा पती, सासू सासरे व इतर नातेवाईक अशा सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हदगाव ता. केज येथील भाग्यश्री अजित यादव वय २१ वर्ष या विवाहितेस तिच्या सासरी तिच्या पतीला ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रु. घेऊन ये, अशी मागणी करीत असत. मात्र भाग्यश्री हिचे आईवडील हे गरीब असल्याने ते पैसे देऊ शकले नाहीत. म्हणून भाग्यश्री हिला सर्वांनी मारहाण करून उपाशी पोटी ठेवत व जाच जुलूम करून नांदवण्यास नकार देत घरातून हाकलून दिले.
भाग्यश्री यादव हिने दि. १६ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात पती अजित रामदास यादव, सासरा रामदास गोवर्धन यादव, सासु अयोध्या रामदास यादव, आजे सासरा, दिर, नंदवा, नंदावी यांच्या विरुद्ध तक्रार दिली असून त्या नुसार सात जणांच्या विरुद्ध गु र न ४५२/२०२१ भा दं वि ४९८(अ), ३२३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. प्रभारी ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाच्या महिला पोलीस जमादार रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.