
केज दि.१७ – मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून एका विवाहित महिलेचा तिच्या पती व सासूने शारीरिक व मानसिक छळ करून घरातून हाकलून दिल्याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील आणेगाव माहेर असलेल्या जयश्री मधुकर कदम हीचा विवाह मधुकर कुंडलिक कदम ( रा. इटकुर ता. कळंब जि. उस्मानाबाद ) याच्यासोबत सन २००५ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही वर्षे झाल्यानंतर तुला मुलबाळ होत नाही असे म्हणत पती मधुकर कदम व सासू कलाबाई कदम यांनी जयश्री हिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घराबाहेर हाकलून दिले. जयश्री हिने माहेरी आणेगाव येथे येऊन युसुफवडगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पती मधुकर कदम, सासू कलाबाई कदम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अंगद पिंपळे हे करीत आहेत.