आरोग्य व शिक्षण
डी डी बनसोडे
September 18, 2021
केज तालुक्यातील 60 वर्षांपुढील जेष्ठ नागरिकांची होणार आरोग्य तपासणी……!

केज दि.१८ – थोडेसे माय बापासाठी पण….. या उपक्रमांतर्गत वृध्द नागरीकांचे आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन केज तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
केज शहराअंतर्गत वार्ड निहाय थोडेसे माय बापासाठी पण या उपक्रमांतर्गत वृध्द नागरीकांची आरोग्य तपासणी दि.२० ते ३० सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कक्ष क्रमांक २७ मध्ये करण्यात येणाऱ्या तपासणीमध्ये रक्तदाब, शुगर, ईसीजी यासह सर्व आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. शहरातील वार्ड निहाय कृतिनियोजन करण्यात आले असून सदरील शिबिरात वैद्यकिय अधिकारी
डॉ. मोराळे, श्रीमती डॉ. राहुल नरोडे, डॉ. बडे, डॉ. मुळे,श्रीमती डॉ. डोईफोडे, डॉ. पुजदेकर, डॉ. वाघमारे हे तपासणी करणार आहेत.
सदरील आरोग्य तपासणीचा लाभ शहर व तालुक्यातील जेष्ठ नागरिकांनी घेण्याचे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संजय राऊत व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी केले आहे.
