आपला जिल्हा

धरणाची देखभाल आणि संवर्धन करणं ही सर्वांचीच जबाबदारी – राजेसाहेब देशमुख

मांजरा प्रकल्प काठोकाठ ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते जलपूजन

केज दि. 19 – धरणातील पाणी मुबलक प्रमाणात मिळावे असे वाटत असेल तर केवळ हक्क न दाखवता त्याची देखभाल आणि संवर्धन करणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही वेळेवर पाणीसारा भरून धरण प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. ते मांजरा धरणाच्या जलपूजन प्रसंगी बोलत होते.
जलपूजन कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष राहुल सोनवणे, आंबा चे चेअरमन हनुमंत मोरे, प्रविणकुमार शेप,पशुपतीनाथ दांगट, दलीलभाई इनामदार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे,कबीरोद्दीन इनामदार,अमर पाटील,कपिल मस्के, समीर देशपांडे, रविकांत सोनवणे,युवक तालुकाध्यक्ष सुजीत सोनवणे, प्रवीण खोडसे, राहुल खोडसे आदींची उपस्थिती होती.

मांजरा धरण सलग तिसऱ्या वर्षी भरले असून आतापर्यंत १६ वेळेस भरले आहे. इकडे पाऊस कमी असून वर पाऊस झाल्याने धारण भरले आहे. यावर्षी धरण भरले नसते तर ऊस मोडण्याची स्थिती निर्माण होती की काय असे वाटत होते.परंतु धरण भरल्याने शेतकरी सुखावला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी अभियंता शाहूराज पाटील, आशिष चव्हाण, व्ही.एस.ठोंबरे,पी.पी.आव्हाड यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना योग्य सूचना केल्या.

 

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close