आपला जिल्हा
कळंब अंबाजोगाई रोडवरील बोरीसावरगाव येथे एक तास रास्ता रोको……!
केज दि.20 – तालुक्यातील लाडेगाव येथे गायरान जमिनीवरून मागच्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. यातूनच येथील कांही तरूणावर ॲट्रॉसिटी गुन्हा कांही दिवसांपुर्वी युसुफवडगाव पोलीस स्टेशन ला दोन टप्प्यात दाखल झाला आहे. मात्र सदरील गुन्हे हे खोटे असल्याचे आंदोलकांचे म्हणणे असून त्याची कसुन चौकशी करण्यात यावी व गुन्हे मागे घ्यावेत यासाठी दि. 20 रोजी बोरीसावरगाव येथे तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे ,छावा जिल्ह्याध्यक्ष शिवाजी ठोंबरे, गोविंद शिनगारे, राहुल खोडसे, प्रवीण खोडसे, मनोराम पवार, नवनाथ अंबाड, महेश अंबाड, सुधाकर मुळे, अरविंद थोरात,शेखर थोरात,गजानन अंबाड, महादेव मुळे सह पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. रास्ता रोको मध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
दरम्यान, युसुफ वडगाव पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या उपस्थितीत केज चे नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांनी निवेदन स्वीकारल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.