केज दि.२० – गांधी कुटुंबियाच्या विश्वासू तथा काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या मा.खा.रजनीताई पाटील यांचे काँग्रेस मध्ये असलेले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून त्या राज्यसभेच्या खासदार होणार हे निश्चित झाले आहे.
रजनीताई पाटील यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृतपणे कळवण्यात आले असून दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्या नियुक्त करण्यात येणार आहेत. सध्या त्या जम्मू काश्मीर च्या प्रभारी असून पक्ष वाढीसाठी त्यांचे नेहमीच मोठे योगदान राहिलेले आहे.तसेच त्या पक्षाच्या एकनिष्ठ सदस्या म्हणूनही त्यांची वेगळी ओळख असून पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्या विश्वासू मानल्या जातात त्यामुळे त्यांची हायकमांड शी हॉट लाईन असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून जिल्ह्याला रजनीताई यांच्या रूपाने आणखी एक खासदारकी मिळणार आहे. त्यांच्या रूपाने मिळणाऱ्या खासदारकीमुळे जिल्ह्यातील जनतेत चैतन्य निर्माण झाले आहे.