#Corona
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मोठा खुलासा…..!

मुंबई दि.23 – देशात कोरोना संक्रमितांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी कोरोनाबाधितांचे 26 हजार रूग्ण सापडले आहेत. तर 252 लोकांचा मृत्यू झाला आहे. एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस आता महामारी राहिलेली नाही. मात्र त्यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे की, भारतातील प्रत्येक व्यक्तीच व्हॅक्सीन होत नाही तोपर्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. तसेच सणांच्या दिवसात गर्दी टाळणं गरजेचं आहे.
डॉ. गुलेरिया म्हणाले की, भारतात नोंदवले जाणारे आकडे आता 25 हजार ते 40 हजारांच्या दरम्यान येत आहेत. जर लोकांनी सावधगिरी बाळगली तर हा आकडा हळूहळू कमी होईल. मात्र, कोरोना कधीही पूर्णपणे संपणार नाही. तसेच भारतात वेगाने लसीकरण होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा लवकरच आटोक्यात येणार आहे. तसेच ते म्हणाले की, कोरोना विषाणू लवकरच एक सामान्य फ्लू म्हणजेच सामान्य खोकला, सर्दी सारखा होईल. कारण आता लोकांमध्ये या विषाणूविरूद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. परंतु आजारी आणि कमी रोग प्रतिकारशक्ती असलेले लोकांना मात्र या कोरोनाचा धोका आहे. लसीकरण झालेल्यांच्या मनात एक प्रश्न देखील आहे की, लस आयुष्यभर संरक्षण देईल की काही काळानंतर पुन्हा बूस्टर डोसची आवश्यकता असेल? या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, भारतात सर्व लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले पाहिजेत, मुलांनाही लस मिळायला हवी. तरच बूस्टर डोसवर जोर दिला जाईल.
पुढे ते म्हणाले की, जगातील सर्व देशांतील लोकांना ही लस मिळायला हवी, हे लक्षात घेऊन भारत सरकारने ऑक्टोबरमध्ये लस मैत्री कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याविषयी म्हटले आहे. एप्रिल महिन्यात, भारत सरकारने भारतीयांना प्राधान्य देत, इतर देशांना लस दान करण्याचे काम काही काळासाठी स्थगित केले होते, परंतु एम्सच्या संचालकांच्या मते, जर जगातील कोणत्याही देशातील लोक सक्षम नसतील तर लस घ्या. हा विषाणू पुन्हा कुठूनही पसरू शकतो. या दिशेने भारत जगाला लस वितरीत करून आपली जबाबदारी पार पाडत आहे. मात्र, काही काळानंतर, खूप आजारी, वृद्ध किंवा कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांना बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. तसेच बूस्टर हे त्याच लसीचे असावे असे काही आवश्यक नाही.
दरम्यान, काही लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता असू शकते. हे बूस्टर इतर लसींसाठी देखील वापरले जाऊ शकते. पण यावर निर्णय घेतला जाईल, प्रत्येकाने आधी लस घेणे आवश्यक आहे, मग बूस्टरची पाळी येईल. डॉ.गुलेरिया म्हणाले की, डिसेंबरपर्यंत प्रत्येकाला लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.