दि. २० सप्टेंबर रविवार रोजी केज येथील विश्राम गृहावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य निरीक्षक मनोहर जायभाये, सुधाकर तट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हनुमंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली केज तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती निवडी संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत केज तालुका कार्याध्यक्षपदी विनोद ढोबळे व प्रधान सचिव विजयराज आरकडे यांची निवड करण्यात आली.