शेती
ओला दुष्काळ जाहिर करा – बाळासाहेब ठोंबरे……!

केज दि.24 – यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. परंतु दिनांक २३ रोजी झालेल्या आतिवृष्टीमुळे केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान व पडझड झालेली आहे.
सर्व नद्यांना प्रचंड प्रमाणात पुर आल्यामुळे नदीकाठच्या शेती वाहुन गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या संकटकाळा मध्ये शासनाने शेतकऱ्यांना आधार देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे व पडझडीचे तात्काळ पंचनामे करुन ओला दुष्काळ जाहिर करावा व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊन पिकविमा लागु करावा अशी मागणी केज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उपेंद्र शिंदे, सचिन राऊत यांचीही उपस्थिती होती.
