शेती
केज शहरात अर्धनग्न चक्काजाम आंदोलन…….!
केज दि.२४ – दिल्लीत चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची हाक डाव्या पक्षांनी दिलेली आहे. त्या अनुषंगाने केज शहरात अर्धनग्न चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन भाई अशोक रोडे यांनी केले आहे.
नव्याने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत, कामगार कायदया मध्ये बदल केलेला थांबवावा, देशात होत चाललेले खाजगीकरण थांबवावे, नवीन विज बिल विधेयक रद्द करावे, बीड जिल्ह्यातील उसाचा एफआरपी शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करावी, पीक विम्याची 2020 मधील रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी, सोयाबीन सह शेतीमालाचे भाव दिवसेंदिवस घसरत चालले आहेत त्यामुळे शेतीमाला हमी भाव द्यावा. इत्यादी मागण्यांसाठी दि.27 रोजी 11 वाजता केज बस स्थानका समोर अर्धनग्न चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, या मागण्याला सहमत असणाऱ्या पक्ष संघटना यामध्ये सामील होणार आहेत. अशी महिती केज कार्यालयीन चिटणीस भाई अशोक रोडे, मंगेश देशमुख, महेश गायकवाड, अशोक डोंगरे, आमीर ईनामदार, हनुमंत मोरे, जी. डी. देशमुख, बाबाराजे गायकवाड, राज तपसे, डिगांबर मगर, दत्ता अस्वले, हनुमंत चाळक यांनी दिली आहे.