हवामान
सांडव्याच्या पाण्यामुळे नदीला पूर, पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला…….!
डी डी बनसोडे
September 26, 2021
बीड दि.26 – मागच्या कांही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. जिल्ह्यातील लहान मोठे सर्वच तलाव तुडुंब भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. मांजरा धरणाचेही 6 दरवाजे उघडले असून दिवसेंदिवस पाण्याचा विसर्ग वाढवावा लागत आहे. तर वडवणी तालुक्यातील कुंडलिका प्रकल्प तुडुंब भरला असून सांडव्यातून पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे.
दरम्यान रात्रीही जिल्ह्यात सर्वदूर आणि दमदार पाऊस झाल्याने कुंडलिका नदीला मोठा पूर आल्याने उपळी हुन वडवणी, माजलगाव कडे जाणाऱ्या पुलावरून डोक्याइतके पाणी वाहत असल्याने संपूर्ण संपर्क तुटला होता. तर नदीच्या आजूबाजूला असलेल्या शेतात पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात आणखी तीन चार दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने ओल्या दुष्काळा चा सामना करावा लागणार आहे.
मांजरा प्रकल्प द्वार उघडल्याची सदयास्थिति ऊंची(सेमी) दि.26/09/2021 10amवाजता
1)व्दार क्र1=1.50मी
2)व्दार क्र2=1.50मी
3)व्दार क्र3=1.50मी
4)व्दार क्र4 =1.50मी
5)व्दार क्र5 =1.50मी
6).व्दार क्र6=1.50मी
7)माउका विसर्ग=1.27क्युमेक्स = 44.84क्युसेस्क
8)मडाका विसर्ग= 00क्युमेक्स= 00 क्युसेस्क
9)एकुण आवक = 769.38क्युमेक्स=27169.88 क्युसेस्क
10)एकुण विसर्ग=769.38+1.27=
770.65क्युमेक्स=27169.44+
44.85=27214.29क्युसेस्क
शाहुराज पाटील (शाखाअभियंता)
1)व्दार क्र1=1.50मी
2)व्दार क्र2=1.50मी
3)व्दार क्र3=1.50मी
4)व्दार क्र4 =1.50मी
5)व्दार क्र5 =1.50मी
6).व्दार क्र6=1.50मी
7)माउका विसर्ग=1.27क्युमेक्स = 44.84क्युसेस्क
8)मडाका विसर्ग= 00क्युमेक्स= 00 क्युसेस्क
9)एकुण आवक = 769.38क्युमेक्स=27169.88 क्युसेस्क
10)एकुण विसर्ग=769.38+1.27=
770.65क्युमेक्स=27169.44+
44.85=27214.29क्युसेस्क
शाहुराज पाटील (शाखाअभियंता)