रस्ता ओलांडताना तरुण गेला वाहून, प्रेत रस्त्यावर ठेवून ग्रामस्थांचा ठिय्या……!
गेवराई दि २६ – रात्री झालेल्या पासवसांत तालुक्यातील नदी ला पुर आला असुन भोजगाव येथील तरूण रस्त्या ओलांडत असतांना पाण्यात बूडाला असल्याची माहिती समोर आली आहे. सदरची घटना आज सकाळी घडली.त्या तुरूणाचा मृत्युदेह धोंडराई जवळ सापडला आहे .
सुदर्शन संदिपान संत ( वय ३७ वर्ष ) रा. भोजगाव तालुका गेवराई जिल्हा बीड असे पुरात वाहूण गेलेल्या तरूणाचे नाव आहे. दोन दिवसांपुर्वी याच ठिकाणी एका मुलीने आत्महत्या केली होती त्यामुळे नातेवाईक यांच्यावर प्रेत खांद्यावर नेण्याची नामुष्की आली होती. याठिकाणी महिना भरात भोजगाव मधील हि तिसरी घटना आहे. आणखी किती बळी गेल्यावर भोजगांवाचा पुल होणार असा प्रश्न येथील ग्रामस्थ विचारत आहेत.
दरम्यान, सदरील तरुणाचा मृतदेह धोंडराई जवळच्या कॅनाल मध्ये सापडला असून पाण्याबाहेर काढला आहे. भोजगाव येथील ग्रामस्थ आक्रमक होऊन त्यांनी शेवगांव रस्त्यावर शव ठेऊन ठिय्या अंदोलनाला सुरूवात केली आहे. जोपर्यंत तुटलेला पुल होत नाही तो पर्यंत अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला असुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.