शेती
हेक्टरी 50 हजार भरपाई द्या – राहुल खोडसे…..!
केज दि.26 – तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. परंतु दिनांक २० ते २६ तारीख दरम्यान झालेल्या आतिवृष्टीमुळे केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान व पडझड झालेली आहे.
सर्व नद्यांना प्रचंड प्रमाणात पुर आल्यामुळे नदीकाठची शेती वाहुन गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या संकट काळामध्ये शासनाने शेतकऱ्यांना आधार देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे व पडझडीचे तात्काळ पंचनामे करुन ओला दुष्काळ जाहिर करावा. तसेच शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी ५०,००० देऊन तात्काळ पिकविमा लागु करून त्याचे लवकरात लवकर वाटप करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे यांनी केली आहे.