हवामान

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा सतर्कतेचा इशारा…..!

केज दि.27 – मागील काही दिवसांत होत असलेल्या पावसामुळे मांजरा आणि तेरणा प्रकल्प प्रकल्प पूर्ण क्षमतेने 100% भरले असून दोन्ही धरणात अजून आवक सुरु असल्याने धरणातील अतिरिक्त पाणी मांजरा नदीद्वारे तसेच कालव्यातून (ROS प्रमाणे) सोडण्यात येत आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात येवून मांजरा आणि तेरणा नदीवरील सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवसांत चांगल्या पावासाची शक्यता असल्याने व जिल्हयातील बहुतांश मध्यम प्रकल्प / बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले असून परिस्थितीनुरूप केव्हाही प्रकल्पातील पाणी विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे. त्यामुळे या नदीकाठच्या सर्व गावानी सतर्क रहावे. संभाव्य पूरपरिस्थिती व विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी खालील काळजी घ्यावी.
                     मुसळधार पाऊस सुरु असताना शक्यतो घराबाहेर जाण्याचे टाळावे. कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात जाऊ नये, जिल्हयातील जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने कोणीही, जलसाठे पाण्यासाठी / पर्यटनासाठी जाऊ नये, नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे. नदीपात्राजवळ घरे असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. आपल्या गरजेच्या वस्तू (उदा. औषधी, रोख रक्कम) स्वतः जवळ बाळगावे, नदीपात्राजवळ आपली मुकी जनावरे बांधू नयेत. मुकी जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
                 सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी / नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी 03 ते 07 या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये, कारण सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली/पाण्याच्या स्त्रोताजवळ/विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ / नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर / नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये, शाळा,महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे, पुलावरून / नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल / नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये.
           तसेच पाउस सुरु असताना विजेच्या तारा / जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची / खबरदारी घ्यावी.  स्थानिक पोलीस अधिकारी / तलाठी/ मंडळ अधिकारी / ग्रामसेवक / सरपंच / कृषी सहाय्यक / (शहरी भगात म.न.पा./न.प. यांचे अधिकारी) यांचेशी संपर्कात राहून ते देत असलेल्या सूचनांचे पालन करावे. आपल्या आप्तेष्टांना तसेच गावक-यांना सावधगीरीची सूचना देवून योग्य ती उपाययोजना करावी असे निर्देश विजयकुमार ढगे  अपर जिल्हा दंडाधिकारी तथा मु.का.अ. लातूर यांनी दिले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close