#Social
डी डी बनसोडे
September 28, 2021
मानवलोक मदतीसाठी सरसावले, जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचा निर्धार……!

केज दि.२८ – पीडित, वंचित आणि दुर्लक्षित घटकांना मदत करण्या बरोबर समाजोपयोगी कार्यात आणि संकट काळात सर्वात अगोदर मदतीचा हात पुढे करणारी सेवाभावी संस्था म्हणून मानवलोक कडे पाहिल्या जाते. केवळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसणारे, कोरडे सांत्वन करणारे भरपूर आहेत. परंतु कुठलाही गाजावाजा न करता सेवाभाव जपणाऱ्या मानवलोकने या अस्मानी संकटात सर्वात अगोदर मदतीचा हात पुढे केला आहे.
हवामान बदलाचे परिणाम आपल्या सर्वांना त्रासदायक ठरत आहेत. सरासरी ६६६.३४ मि.मी. पावसाच्या बीड जिल्ह्यात आज अखेर जवळपास १००० मि.मी. पाऊस झाला आहे. मानवलोक मुख्यालयात आम्ही नियमित पावसाची नोंद ठेवतो आणि इथे तर आज अखेर एकूण १५६४.६ मि.मी. पाऊस झाला आहे. गेली 4 -5 दिवस सततच्या पावसाने तर सर्वदूर प्रचंड नुकसान केले आहे. पीकेच काय शेत जमिनी वाहून गेल्या आहेत. काही जणांची जनावरे दगावली, वाहून गेली. सर्व बाजुनी रस्ते बंद झाले आहेत, संपर्क व्यवस्था तुटली आहे. नद्या धोक्याच्या पातळी पेक्षा बऱ्याच ऊंचीवरून वहात आहेत. काढणीला आलेले सोयाबीन सारखे पीक उभे असताना कोंब फुटायला लागलेत. अद्रक, ऊस, अशा अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.संकटाच्या अश्या गंभीर प्रसंगात मानवलोक नेहमीच आपल्या लोकांसाठी प्रयत्नशील राहिले आहे. या संकट समयी सुध्दा मानवलोक परिवार आपल्या सोबत आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात कोणालाही जीवन आवश्यक वस्तूची, मेडीकल सपोर्ट, इ. आवश्यकता असेल तर कृपया खालील नंबरवर टिमला संपर्क करण्याचे आवाहन कार्यवाह अनिकेत लोहिया मानवलोक अंबाजोगाई च्या वतीने करण्यात आले असून खालील नंबरवर संपर्क करण्याचे कळवण्यात आले आहे.
लालासाहेब आगळे – 7770015005
डाँ. विनायक गडेकर – 7770015004
श्री.शाम सरवदे – 7770015030
श्री.रामदास काळे – 7770015048
श्री. इरफान शेख – 9404262313