संपादकीय

केज शहरातील दुसरा पर्यायी रस्ताही पडला बंद, वाहनांच्या लागल्या रांगा…..!

केज दि.1 – केज अंबाजोगाई रोडवरील पिसाटी पुलाचे काम सुरु असल्याने केलेला पर्यायी रस्ता वाहून गेल्याने  दोन दिवस वाहतूक बंद होती. बीड, अंबाजोगाई, लातूर आणि परळी कडे जाण्याऱ्या वाहनांना रस्ता पूर्णपणे बंद असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. परंतु दोन दिवसानंतर रस्ता पूर्ववत सुरू झाला.
        मात्र केज शहरातुन कळंब कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने मोंढ्यातून वळण रस्ता केलेला आहे. तो वळण रस्ता खचल्याने त्यात सकाळी सहा वाजता आणि 9 वाजता ट्रक फसल्याने सकाळ पासून वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. कसल्याच प्रकारचे वाहने जात येत नसल्याने कळंब रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेकांना परत फिरावे लागत आहे.

          दरम्यान ट्रक काढून दुरुस्तीचे काम सुरू असून दुपारपर्यंत तात्पुरती वाहतूक सुरू होण्याची अपेक्षा आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close