केज दि.१२ – आर्थिक परिस्थिती जेमतेम मात्र शिकण्याची तीव्र इच्छा आणि केवळ शिकणे म्हणजे साक्षर होणे नाही तर आपण शिकून काहीतरी वेगळं करून दाखवणं यासाठी शिक्षण घेणे गरजेच हे ध्येय बाळगून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अगदी गावातल्या शाळेत घेऊन डॉ.सुवर्णाचे रंजित सोनवणे हिने २०१९ मध्ये दिलेल्या एमपीएससी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले व यामध्ये पशुधन विकास अधिकारी गट – अ या जागेवर यश मिळवले तिच्या या यशाबद्दल तिचे माहेर असलेल्या सारणी (आ) च्या गावकऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
सुवर्णा रंजित सोनवणे ही केज तालुक्यातील सारणी (आ) येथील ही रंजित गंगाधर सोनवणे यांची कन्या तिचे १० वी पर्यंतचे शिक्षण गावातीलच पुरुषोत्तमदादा सोनवणे माध्यमिक विद्यालयात पूर्ण झाले नंतर पुढील १२ वी पर्यंतचे उच्च् माध्यमिक शिक्षण योगेश्वरी महाविद्यालय आंबेजोगाई येथून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन पूर्ण केले. त्यानंतर तिने आपले पदवीचे शिक्षण पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथून B.V.Sc & A.H ही पदवी घेऊन पूर्ण केले. व पदव्युत्तर शिक्षण स्नात्त्तकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथून पशुविक्रतिशास्त्र या विषयामधे विशेष ज्ञान तिने संपादन केले. त्यानंतर त्याच विषयामध्ये ती NET ची परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाली. सर्व शिक्षण पूर्ण झाल्या नंतर तिने २०१९ साली लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या पशुधन विकास अधिकारी गट-अ (राजपत्रित अधिकारी, श्रेणी-१) हि परीक्षा दिली व ती परीक्षा अतिशय चांगल्या गुणांनी ती उत्तीर्ण झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिराती चा अंतिम निकाल दि 8/10/2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे त्यामधे डॉ.सुवर्णा रंजित सोनवणे यांची निवड झाली आहे त्यामधे त्यांचा over-all 75 rank असुन मुलींमध्ये 13 रँक आहे.
तिच्या या यशाबद्दल सारणी ग्रामस्थांनी तसेच काँग्रेसचे नेते, राहुल सोनवणे, संतोष सोनवणे यांच्यासह पुरुषोत्तमदादा सोनवणे विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एच.लोमटे व सर्व कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.