केज दि.१५ – ल घरासमोरील मोकळ्या पटांगणात बैलगाडी का लावली व मुलास चापट का मारली अशी विचारणा केल्याच्या कारणावरून दोन गटात दगड आणि बॅटने झालेल्या हाणामारीत तिघे जण जखमी झाल्याची घटना केज तालुक्यातील बोरगाव ( बु. ) येथे १५ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी सहा जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
बोरगाव ( बु. ) येथील संतोष तुकाराम गव्हाणे ( वय ४६ ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या घरासमोरील मोकळ्या पटांगणात बळीराम शंकर गव्हाणे, संतोष उर्फ अण्णा बळीराम गव्हाणे यांनी बैलगाडी लावली होती. त्यांना बैलगाडी का लावली अशी विचारणा करून बैलगाडी काढून घ्या असे संतोष गव्हाणे हे म्हणाले असता त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. तर बाळासाहेब गव्हाणे व विलास गव्हाणे हे भांडण सोडविण्यास आले असता बळीराम गव्हाणे व संतोष उर्फ अण्णा गव्हाणे या बापलेकांनी दगड फेकून मारल्याने बाळासाहेब यांचा ओठाला दुखापत झाली असून विलास यांच्या पायाचे हाड फॅक्चर होवुन गंभीर जखमी झाले. तुम्ही बैलगाडी कशी लावु देत नाहीत असे म्हणुन धमक्या दिल्या. संतोष गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून बळीराम गव्हाणे व संतोष उर्फ अण्णा गव्हाणे या दोघा बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या गटाचे बळीराम शंकर गव्हाणे ( वय ६५ ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा संतोष उर्फ अण्णा यास बंडु तुकाराम गव्हाणे याने चापट मारली होती. त्यावरून चापट का मारली अशी विचारणा करण्यास बळीराम गव्हाणे व त्यांची पत्नी गेले असता बंडू गव्हाणे व आशितोष तुकाराम गव्हाणे या दोघांनी शिवीगाळ करीत लाकडी बॅट बळीराम गव्हाणे यांच्या डोक्यात मारून डोके फोडले. तर त्यांचा मुलगा व पत्नी हे दोघे भांडण सोडविण्यास आले असता बाळु तुकाराम गव्हाणे व बाबु शहाजी गव्हाणे या दोघांनी लाथाबुक्क्याने मारहाण करून मुकामार दिला. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. बळीराम गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून बंडु गव्हाणे, आशितोष गव्हाणे, बाळु गव्हाणे, बाबु गव्हाणे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करत आहेत.
केजमध्ये रहदारीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाई
केज दि.१५ – शहरातील बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर वाहने उभे करून रहदारीस अडथळा आणून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या दोन अपेरिक्षावर पोलिसांनी कारवाई केली. संबंधित अपेरिक्षा चालकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
उंदरी येथील अपेरिक्षा चालक अशोक भीमराव ठोंबरे याने अपेरिक्षात ( एम. एच. ४२ – ५७८२ ) बांधकामाचे लोखंडी गज भरून ते गज अपेरिक्षाच्या बाहेर आलेल्या स्थितीत अपेरिक्षा हा १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर रहदारीस अडथळा व लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे लाऊन चालक ठोंबरे हे कुठेतरी निघून गेले. असे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील जमादार बालाजी दराडे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांच्या फिर्यादीवरून चालक अशोक ठोंबरे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कुंबेफळ येथील चालक दत्तात्रय तुकाराम घाडगे हे १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अपेरिक्षा ( एम. एच. ४४ सी ५३२६ ) वाहतुकीस व लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर उभा करून कोठेतरी निघून गेल्याचे ठाण्यातील पोलीस नाईक जगजीवन करवंदे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक दत्तात्रय घाडगे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल आहे. या दोन्ही गुन्ह्याचा पुढील तपास प्रशिक्षणार्थी फौजदार प्रमोद यादव हे करीत आहेत.